Sunday, June 27, 2010

हजारो ख्वाब देखे हमने ,
हम सच देखना भूल गए,
अंधेरा है रस्ते पे सोच,
आखे बंद करली हमने ,
हम उजाले मै आखे खोलना भूल गए.

अंधार

अंधाऱ्या रात्री, अंधाराची साथ
अंधारी वाट, अंधारासोबत,
अंधारच मित्र सोबतीला
अंधाऱ्या रात्री,
अंधार अनंत,
सर्व शांत अंधारात,
अंधाराचे गात्र जसे
गणिताचे सूत्र
कधी साधे , कधी क्लिष्ट
अंधाराचे भय अंधारात नसे ,
जेव्हा
प्रकाश दाटे ह्रिदयात

हळकुंड

चित्र काढता येतात मला ,
फोटो हि ठीकठाक काढतो
थोडफार लिहितो हि मी
मी अर्ध्या हळकुंडात पिवळा

माकड आणि डोंबारी

मकड़ा ने केला डोंबाऱ्या विरूद्ध संप,
म्हणाला पगार वाढवा,
रोज दोन पोळ्या सोबत,
में महिन्यात आंबा पण हवा.
YEARLY थोड़ी सूटी आणि
गळ्यात चांगला पट्टा असवा
डोंबारी म्हणाला H R कड़े जा.
HR कड़े जाता , तिथे समजले की
आधी लास्ट YEAR चा पर्फोमंस बघवा लागेल,
थोड़ी पाने इकडे तिकडे करून HR म्हणाले,
अप्रेझल तुला यावर्षी मिळणार नाय ,
तुझा पेर्फोमस या वर्षी एकदम वीक हाय,
तू थोड हार्ड work अजून कर ,
मग पाहू पुढच पुढे
हताश माकड परत डोंबाऱ्या कडे परत आला
पाहतो तर काय नव्या माकडा सोबत डोंबारी बसेलाला होता

आजकाल माकड नव्या माकडाला ट्रेन करताय
आपलं हाप प्याकेज त्याच्या सोबत शेअर करतंय.

TONIC

कुठे आहेस ?
ऑफिसात
का ?
आरे काम आहे
मग मी काय करू इतका वेळ ?
मला क्या माहित ?
हे क्या उत्तर झालं ?
तू इतक्या लवकर का आलास ?


hmm ...
ये लवकर मी वाट बघतोय .
बर बाबा मी ट्राय करते

ती आली थोडी लवकरच
आणि वाट बघण्याची मजाच गेली
मी वैतागलो
म्हणालो , तुला उशीर ना होणार होत ?
मग ?
आरे मग आली ना लवकर
तीच तर गोची आहे

वाट बघण्याची माझा
तुला क्या समजणार
आपल्या जुन्या आठवणी
आठवायची मजा तुला
नाही उमगणार

ही वेळच मला तुझ्या
अधिक जवळ आणते
तुझ्या विरहानेच
तुझी जवळीक आजून
आजून मला भासते

तू नेहमीच उशिरा ये
माझ्या साठी प्लिज
आपलं प्रेम घटट
करण्याचं एकमेव TONIC

जन्या जन्या

जन्या  जन्या

काय रे बा ?

प्यायलिस दारु ?

नाय रे बा ?

मग बाटलि अन चखना इथे कसा ?

 माला का माहित,रे बा

उघड आता तोंड ,चखना खातो ना?

नाय रे बा ?

उघड आता तोंड

हाह हाह हाह हाह..

Thursday, June 24, 2010

उगाचच काहीतरी ......म्हणजे मला वाटलेलं ,नाहीत्या वेळी सुचलेल काही तरी आहे,हे काहीतरी म्हणजे काय ते आजून मला कळलेल नाही,त्यामुळे ते इतरांना काळाव आशी अपेक्षा मी करत नाही.विवध वेळी, कधी कोणाची खेचायला,कोणाला त्रास द्यायला नाहीतर इतर कोणा कारणाने उगाचच लिहिलेले हे काही तरी हे पुढे आहे , उगाचच वेळ असेल तर वाचा, नसेल तर वेळ उगाचच मिळेल तेव्हा वाचा आणि उगाचच्या उगाचच काही तरी मानून सोडून द्या .