Sunday, June 27, 2010

अंधार

अंधाऱ्या रात्री, अंधाराची साथ
अंधारी वाट, अंधारासोबत,
अंधारच मित्र सोबतीला
अंधाऱ्या रात्री,
अंधार अनंत,
सर्व शांत अंधारात,
अंधाराचे गात्र जसे
गणिताचे सूत्र
कधी साधे , कधी क्लिष्ट
अंधाराचे भय अंधारात नसे ,
जेव्हा
प्रकाश दाटे ह्रिदयात

No comments:

Post a Comment