Thursday, July 8, 2010

गाढव प्रेमं

गाढव प्रेमं
प्रेमात पडल्या वर माणूस गाढव बनतो
मग गाढव काय बनत असेल ?
असा प्रश्न मी माझ्या
नेहमीच प्रेमात पडणाऱ्या मित्राला विचरला

माहित नाही बुवा ,
सध्या मी तिच्या प्रेमात गाढ बुडलो आहे
असे तो म्हणाला

मी म्हणालो "पुन्हा?"
हे कितवे ?
खर प्रेम हे पहिलंच तो म्हणाला
मग गेली दहा प्रेमं.... त्याचं काय ?
ती .....
ते फक्त मनाचे खेळ होते माझ्या
हे खर खुर आहे
मी म्हणलो बरं, असेल बुवा
आपल्याला काय ?
आपण कुठे प्रेमात पडलोय कोणाच्या ?
पण मग गाढवाचे काय ?
मी मित्राचा विचार सोडला

दोन्ही विचार विसरून आता
गेला बराच काळ
अंदाजे महिना भर अधिकच
बसलो होतो पुन्हा विचार करत
नेहमीच्या कट्ट्यावर कसलातरी
तोच शेजारून गाढवासारख्या स्वरात
कोणी तरी रडू लागल,
गाढव आसपास नसतानाही
हे कोन रडताय पाहता
माझा प्रेमात पडणारा मित्र दिसला

अरे काय झालं? रडतोस का ?
माझा डायलॉग संपण्या आधीच
त्याने माझा खांदा धरला
भदाभदा रडत,माझा शर्ट ओला करत
चिरक्या आवाजात तो बोलला
तिने मला सोडलं,माझ्या नकळत
माझ्या साहेबालाच तिने गटवल ,
आता मी जगू कसा ?
त्याने मला प्रश्न केला
उत्तर काय द्यावं, विचार करत होतो
इतक्यात पुन्हा कोणी तरी गाढवा सारखं हसलं
आणि पाहतो तर काय
समोरून खरच एक गाढव आम्हा कडे पाहत
हसत हसत निघून गेलं.

1 comment: