Monday, August 30, 2010

येडं मन

माझं मन येडं तिज्याआयला,
कश्यावर पण जाऊन कोलमडतय ,
कधी फुलावर,कधी फुलपाखरावर
गुपचूप जाऊन बसतंय

माझं मन येडं तिज्याआयला
झोके घेई आठवणीच्या हिंदोळ्यावर ,
अन कधी रितं होई
भरल्या पावसाच्या ढगागत.

माझं मन येडं तिज्याआयला
सुसाट धावे वाऱ्यागत,
अन कधी मिटून जाई
लाजाळूच्या पानागत.

माझं मन येडं तिज्याआयला
मृगजळा मागे पळते,
हातात काही नाही म्हणून
उगाचच हळहळते.

माझं मन येडं तिज्याआयला
भलत्या विचारात एकदम पुढे.
सुखाच्या क्षणात ही त्याला ,
दुःखाचे येते भरते

माझं मन येडं तिज्याआयला
येडेच बर आहे
त्याच्या मुळेच तर मला
जगण्याचे कारण मिळते.

No comments:

Post a Comment