Monday, March 21, 2011

थेंब

मी एक थेंब आहे
विशाल महासागरातला
स्वतःचे अस्तित्व नसलेला
तरीही अस्तित्व जपू पाहणारा

Thursday, March 17, 2011

होप

अति काम गळून घाम
उपयोग काही नाही
फुकट सारा दिवस जातो
happy आम्ही नाही

सिगारेट चा कश
आणि कटिंग चा चहा
सतत सतत मिटिंग
आणि डेड लाईन ची हवा

काम काम अती काम
मिळाले त्यातून काय ?
घरचे सगळे विसरले
मित्र सारे पसरले

एक्स्ट्रा प्याकेज ची
ती कल्पना आम्हा भोवली
काम कसले कमी
आता जिम्मेदारी वाढली

रोज होई लेट नाईट
बोलणार तरी काय?
लाईफ चा तो मीटर
थांबणार कसा काय?

म्हणून जे सारं चालू आहे
तसच चालू द्यावं
होपलेस न होता
होप ठेवून जगावं

एक दिवस आपला येईल
नक्की आहे खात्री
तो पर्यंत आहे तसं घडू देणे
ही आपली ड्यूटि

Tuesday, March 15, 2011

मन

मन अथांग सागर
त्याला खडकाचा किनारा
कधी शांत शांत सारे
कधी तुफानश्या लाटा

मन अथांग सागर
दूर क्षिताजा पार गेला
कवेत घेवून सूर्या
अस्ताला नेणारा

मन अथांग सागर
त्याला छप्पर आकाशाचे
कधी स्वच्छ स्वच्छ सारे
कधी अंधारून आलेले

मन अथांग सागर
त्याला चंद्राची ती ओढ
अशक्य जरी काही
त्याला उंच उंच उधाणे

मन अथांग सागर
त्याचा ठाव ना कुणाला
अथक प्रयत्ना नंतरही
एक प्रश्न चिन्ह मोठे

मन अथांग सागर
धरणीला बिलगलेला
जरी बांध नसे त्याला
किनाऱ्याने बांधलेला