Monday, October 17, 2011

मी एक मेंढरु

भर पावसात चिंब भिजूनही मी सुकाच,
खडकात दबलेल्या बेडकीगत
जगापासून दूर , खूप अलिप्त
तरीही मेंढरागत एकसंघ चालतोय
कुणाच्या तरी पाठीमागे
का कुणास ठाऊक
कदाचित जनरीत म्हणून

बंध झुगारीन म्हणतोय
पण हिम्मत होत नाही
कदाचित अंगात जोर नाही
किवां वेडा म्हणून वाळीत पडण्याची भीती

असं असत्य किती वेळ जगू
की वेडा ठरून आपल्या मार्गाने चालू
विचार करतानाही मी घाबरलोय
आजून ही चालतोय मेंढरागत
कुणाच्या तरी पाठीमागे.