Tuesday, October 2, 2012

चल ना पुन्हा प्रेमात पडूया

एका जाहिरात संस्थे साठी सहज टाइमपास म्हणून केलेली कविता , पुढे काही झालं नाही , फार दिवसांनी मिळाली आता प्रकाशित करतोय


चल ना पुन्हा प्रेमात पडूया
निळे आकाश , हिरवे डोंगर
एकमेकांच्या डोळ्यांनी पाहूया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया
चिंब पावसात पुन्हा भिजूया
ओल्या वाटेवर आडोश्यापाशी
घट्ट मिठी होऊया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया
बेभान होऊ वाऱ्यागत
किवां
भरतीच्या लाटेसारखं
किनाऱ्याशी भांडूया
हातात हात घेऊन
शांत सूर्यास्त पाहूया
चल ना पुन्हाप्रेमात पडूया
प्रेमपत्र लिहूया
दोस्तानी चीडवल्यावर
खोट खोट रागवूया
आणि मग गुदगुल्या झाल्यागत
स्वतः शीच हसूया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया

Thursday, January 19, 2012

शाळेचा मजा काही औरच होता

उन्हाळयाच्या सुटी नंतर मित्रांना भेटण्याचा ध्यास होता
शाळेचा मजा काही औरच होता
नवं कोर दप्तर नवी नवी छत्री
गावाला घडलेल्या नव्या गमतींची जंत्री
गमती सांगण्याचा आणि ऐकण्याचा काळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

नव्या कोऱ्या पुस्तकाचा कोरा कोरा वास
नव्या वहीच्या कव्हर ला स्टीकर ची आरास
वहीच्या आत नेहमीच घोळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

एक रुपयाचा वडा पाव
त्यात चार आण्याचा शेअर होता
तुटक्या फळीचा batball आणि
पुठ्याने टेनिस चा खेळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

दिवस तसे चांगले,स्वप्नाळू डोळ्यांचे
स्वप्नांच्या आकारला लिमिट नव्हता
शाळेचा मजा काही औरच होता

तेव्हा वाट पाहायचो,
लवकर मोठं होण्याची
स्वतत्र लाईफ जगण्याची
या नव्या लाईफ चा झटका खूप हॉरर होता
आणि खरच
शाळेचा मजा काही औरच होता

Thursday, January 5, 2012

पंखा ५

एकदा पंखा बंद झाला
कारण विचारले तर
चक्कर आली असे म्हणाला
हसून हसून लोक वेडे झाले
आणि धक्का देऊन त्यांनी
पंखा सुरु केला