Tuesday, October 2, 2012

चल ना पुन्हा प्रेमात पडूया

एका जाहिरात संस्थे साठी सहज टाइमपास म्हणून केलेली कविता , पुढे काही झालं नाही , फार दिवसांनी मिळाली आता प्रकाशित करतोय


चल ना पुन्हा प्रेमात पडूया
निळे आकाश , हिरवे डोंगर
एकमेकांच्या डोळ्यांनी पाहूया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया
चिंब पावसात पुन्हा भिजूया
ओल्या वाटेवर आडोश्यापाशी
घट्ट मिठी होऊया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया
बेभान होऊ वाऱ्यागत
किवां
भरतीच्या लाटेसारखं
किनाऱ्याशी भांडूया
हातात हात घेऊन
शांत सूर्यास्त पाहूया
चल ना पुन्हाप्रेमात पडूया
प्रेमपत्र लिहूया
दोस्तानी चीडवल्यावर
खोट खोट रागवूया
आणि मग गुदगुल्या झाल्यागत
स्वतः शीच हसूया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया