त ला त ध ला ध म ला म
अग एक चहा आण न ग
(चहा कश्याला आता कडमडायला ?)
अग लिहायला बसलोय ना मी
विचार नको का यायला मला ?
त ला त ध ला ध म ला म
काय लिहावं बर
एखाद नाटक
नको त्या पेक्षा
दीर्घ कविता बरी ,
ते ही नको
आजकाल तिला ही नाही कोणी वाली
त ला त ध ला ध म ला म
काय लिहाव बर ?
अग चहा मिळेल न ग ?
गरज आहे मला
विचार नाही सुचत मला
त ला त ध ला ध म ला म
कादंबरी ला म्हणतो मम ,
इतिहासातली पात्र करतो जिवंत
पण आधी आभ्यास करतो
ती जुनी बखर चाळतो
त ला त ध ला ध म ला म
किती हे रटाळ
नुसते टेक्निकल लिखाण
झोप येतेय मला
त ला त ध ला ध म ला म
अग चहा नको मला
डोळे जड झालेत
झोपतो थोडा
साहित्याचा इतका डोस
आजच्या पुरता पुरे झाला
त ला त ध ला ध म ला म
मस्त लिहिलयस! आवडलं! :D
ReplyDelete