Thursday, December 10, 2015

चित्रे

मी चित्रे का काढतो याच उत्तर खूप सोप आहे , मला चित्रे काढायला आवडतात . मला तश्या अनेक गोष्टी आवडतात जस कि कविता लिहिणे किवा जेवण बनवणे  फोटोग्राफी करणे , फिरणे , गाणी ऐकणे, आणि इतर बरच काही, पण जेव्हा मला स्वताला व्यक्त करायच असत, तेव्हा मला चित्रांचा आधार जवळचा वाटतो. एका जिवलग मित्राप्रमाणे कागद पेन मला वाटतात . 
वास्तविक माझ जे जे मधल  शिक्षण  फोटोग्राफी मधल पण एखादा फोटो सुद्धा मला दिसताना चित्र सारखा दिसतो. 
प्रत्येक वेळी मी चित्र काढतोच आस नाही कारण ते चित्र माझ्या मनात तयार झालेलं  असत, आणि बहुतेक वेळा ते तिथेच राहत 
चित्रकाराला चित्र काढण्यासाठी कसल्या तरी साहित्याची गरज बिलकुल नसते, चित्र त्याच्या डोक्यात नेहमी तयार होत असत , जेव्हा त्याच्या भावनाचा अतिरेक होतो तेव्हा चित्र त्याच्या शरीरातून बाहेर येत आणि कुटल्या तरी माध्यमातून व्यक्त होत. ज्यांच्या बाबतीत आस होत नाही माझ्या मते ते चित्रकारच नव्हेत, अश्या लोकांना फिनिशिंग जमते, तंत्र हि जमत पण चित्र जमत नाही. आर्थात हे माझ मत आहे आणि ते माझ्या पुरत खर आहे इतरांनी त्याच्याशी सहमत होणे मला अपेक्षित नाही. 
प्रत्येक कलाकाराचा मार्ग त्याचा एकट्याचा असतो
मी खूप स्वप्नाळू आहे.२४ तास मी स्वप्न बघतो, स्वप्न माझे विचार पूर्ण करतात, मला काय म्हणायचं ते मला स्वप्नामुळे समजत. जोपर्यंत माझ्या स्वप्नात चित्र पूर्ण होत नाही तोपर्यंत मी चित्र काढूच  शकत नाही. कावळे असो किवा डूडलींग किवा इतर काहीही त्यांची सुरुवात माझ्या स्वप्नातच होते आणि शेवटही स्वप्नातच होतो. 
स्वप्नाळू कलावंत म्हणूनच मला आवडतात त्यांच्या कलाकृतीतून त्यांची स्वप्ने मला दिसतात. से अनेक कलावंत आहेत ज्यांची चित्रे मला आठवत नाहीत पण त्या पाठच्या भावना मला लक्ख दिसतात, कोणाच्या landscape मधला निळा रंग भावतो किवा कोणी मारलेला एक ब्रश स्ट्रोक काळजाचा ठाव घेतो आणि मग येते एक अपूर्ण असल्याची जाणीव. हि जाणीवच मन अस्वस्त करते आणि त्या विचारांची स्वप्ने होतात आणि त्या स्वप्नाची चित्र   

Monday, November 30, 2015

पंखा १२


टेबलावरचा पंखा मान वर करून 
फुल स्पिड फिरत होता 
काय करतोस विचारलं 
सूर्या भोवती जमलेले ढग दूर सारतोय 
असं म्हणाला 

Thursday, October 8, 2015

रेस

सतत तेच सतत तेच 
कुठली तरी सुरु रेस 
एक संपता दुसरी सुरु 
क्षणभर  तरी कसा थांबू?
जिंकलो तरी सुटका नाही 
नवीन शर्यत वाट पाही 
पुन्हा तेच पुन्हा तेच 
कुठली तरी सुरु रेस

Sunday, August 16, 2015

पंखा ११

पंखा खूप सुसाट फिरत होता
जळमटे अंगावर साचवत होता,
खूप काळ गेला, 
जळमटे साचतच राहीली,
अन् पंखा त्यात हरवला
एक दिवस पंखा बंद पडला
मालकाने भंगारात फेकून दिला.

Tuesday, May 26, 2015

पंखा १०

पंख्याचा वेग सुसाट 
सारे खुश ,
पंखा मात्र अस्वथ
एकच विचार ,
गत जन्मीच्या पाप
आणि त्याचेच हे भोग