Tuesday, January 26, 2016

भक्ती


देवा तुझ्यासाठी काय केलं नाही ?
केले उपास तपास आणि अनुष्ठाने लक्ष 
कधी खाल्ली नुसती केळी 
कधी राहिलो नुसता निर्जळी 
देवा तुझ्यासाठी काय केलं नाही ?

घातला तूला दुधाचा अभिषे 
बोलला भगत तेव्हा दिला बळी कोंबडा सुरेख 
घातल्या माळा, दिली ती देणगी 
देवा तुझ्यासाठी काय केलं नाही ?

हसून देव बोले बाळा माझ्या  
मी कधी सांग काय मागितलं तुला ?
केलं सांर तू, जे वाटे तुझ्या मनास 
राहिलास फक्त करायचं प्रेम ,
गेलास दाटून भयाने भक्तीला सोडून. 

Friday, January 8, 2016

पंखा १३

शोभत नाही छताला 
म्हणून उखडून पंखा लावल झुंबर 
गरम होतंय आता मालक म्हणतो 
फिर झुंबरा गरा गर