Tuesday, January 9, 2018

सावज

Station 517B अजूनही अंधारातच होतं. स्टेशनच्या कंट्रोल टॉवरमधून दुरवरच Station 517a मार्क ला अस्पष्ट दिसत होत. त्याच्या समोरचे पॅनल्स आणि स्क्रीन मात्र 517a च्या सर्व activity स्पष्टपणे दाखवत होत्या. पण त्याच्याकडे मार्कच अजिबातच लक्ष नव्हतं. 517a बघण्यात त्याची तंद्री लागली होती. असंख्य विचार त्याच्या मेमरी समोर येत होते. 


517a ह्यूमनॉइड्सच्या ताब्यात गेल्याला आता जवळ जवळ वर्ष होत आलं होतं. अधुनमधुन तुरळक air strike सोडल्या तर बाकी सर्व शांत होतं. Station 517Bच्या भोवताली असलेली डिफेन्स सिस्टीम ते हल्ले परतवून लावत होती. पण तिचा निभाव फार काळ लागेल याची शाश्वती मार्क ला नव्हती. ह्यूमनॉइड्स आता डिफेन्स सिस्टीमलाच टार्गेट करत होते. त्यामुळे जास्तीतजास्त ३-४ महिने हि पोस्ट टिकेल असा अंदाज मार्क बांधून होता. 
मुळात Station 517B war station नव्हतंच त्याचा मूळ उपयोग स्टेशन A साठी supply hub आणि medical center म्हणून होता. अशी सिस्टिम गेली २५ -३० वर्ष म्हणजे युद्धाच्या सुरुवातीच्या काळापासूनची होती. ह्यूमन आणि ह्यूमनॉइड्स युद्ध आजून सुरु झालं नव्हतं पण ते कधीही भडकणार होत. माणसांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना स्वतःपासून वेगळं ठेवण्यासाठी ह्यूमनॉइड्स ही स्टेशन्स उभारली. प्रचंड मनुष्य हानी सहन करून मानवाने ही स्टेशन्स ताब्यात घेतली होती. station A battle station आणि station B इतर सर्व गोष्टीसाठी. आधी ही स्टेशन्स humans कंट्रोल करत, पण अधिक मनुष्यहानी टाळण्यासाठी मानवाने human asset हळूहळू कमी करत घेतला आणि त्याऐवजी माणसासारखे हुबेहूब दिसणारे हॅलोग्राम स्टेशन चा कारभार पाहू लागले. गेल्या काही वर्षापासून स्टेशनवर एकही human राहत नव्हता. आधी human operators हॅलोग्राम्सना हाताळायचे पण त्यात मोक्याच्या क्षणी खूप डिले व्हायचा. अखेरीस माणसाने हॅलोग्रामला संपूर्ण नियंत्रण देऊन टाकल, त्याचा फायदा लवकरच दिसू लागला. हॅलोग्रामच्या कार्यक्षमतेवर माणूस इतका प्रभावित होता की त्याने विचारक्षमता सुद्धा देऊन टाकली. मानव आणि हॅलोग्राम आता खरे सोबती बनले होते, नाही म्हणायला अजूनही shutdown बटण माणसाच्या हाती होत पण त्याने फार फरक पडत नव्हता आणि मार्क ला तर मुळीच नाही. फक्त मानवाचं रक्षण करणं हे त्याच आद्य कर्तव्य आहे असं तो समजत होता.

मानवाचा विचार करता करता डोळ्या समोर मागचा सर्व इतिहास उभा राहिला.

मानवाची प्रगती, त्याच संशोधन, अनेक रोगांवर मात करत करत दीर्घायुषी झालेला माणूस आरामचं जीवन जगत होता. त्याचा महत्वाकांक्षी जीनोम प्रोजेक्ट ही पूर्ण झाला होता. जेनेटिक इंजिनिअरिंग इतकं पुढे गेलं होतं कि एखादा अवयव निर्माण करण हे तितकच सोपं होत जितकं एखाद वाहन बनवणं. डोळे, किडनी, त्वचा काहीही बनवणं मानवाला शक्य होतं, फक्त मेंदू ची निर्मीत करण अजून जमलं नव्हतं. जगातले अनेक शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत होते, अनेक दशकांची त्यांची तपश्यर्या एक दिवस फळाला आली आणि एक दिवस डॉक्टर बेंजामिन ओट नावाच्या शास्त्रज्ञाने एक न्यूरॉन प्रयोगशाळेत बनवला (साला हरामखोर) मार्कने डॉक्टर ओट ला मनापासून शिवी दिली, त्याच्या मते पृथ्वीच्या सर्वनाशाला डॉक्टर ओट च जबाबदार होता. कारण डॉक्टर ओट तिथेच थांबला नाही तर त्याने पुढे जाऊन नुरोनिक कम्प्युटर सुद्दा बनवला, मानवी मेंदूच्या क्षमतेजवळ जाणाऱ्या या संगणकाने मानवाचे काम अधीकच सोपे करून टाकले. ओटच्या कार्याची खूप वाहवा झाली. सार जग ओटला या "father of modern world"  म्हणून संबोधत होतं. पण ओटला काही स्वस्त बसवत नव्हतं, त्याने ध्यास घेतलेला त्याला आता पूर्ण मानव बनवायचा होता. ओट ने पुन्हा कंबर कसली, प्रयोगशाळेत बनवलेले अवयव घेऊन त्याला दोषरहित सर्वगुणसंपन्न मानव बनवायचा होता. जगभरातल्या सर्वात सुंदर, हुशार अश्या लोकांच्या गुणसूत्रातून तो एक शरीर निर्माण करणार होता. अप्रतिम सुंदर, निरोगी शरीर मेंदूच्या जागी त्याने त्याचा नुरोनिक कंप्युटर असेल. या शरीराला भूक लागणार नव्हती कारण ऊर्जा निर्मितीसाठी त्वचे मध्ये त्याने असंख्य सोलर पॅनेल्स जोडले असतील, जे सर्व शरीराची गरज भागवतील.
डॉक्टर ओट च्या कविकल्पनेवर आधी कोणाचाच विश्वास नव्हता, पण ओट ला खात्री होती की त्याला यश मिळणार आणि झालं ही तसच, काही वर्षातच ओटने चालताबोलता मानव प्रयोगशाळेत निर्माण केला, त्याने त्याला ह्यूमनॉइड नाव दिलं. हे ह्यूमनॉइड्स मानवाला सर्वबाबतीत मदत करणार होते, माणसाच्या प्रत्येक गरजेनुसार ह्यूमनॉइड्स ची निर्मिंती होणार होती. सैन्यासाठी युद्धनिपुण हुंनॉईड्स, शेती, अवजड कामासाठी कामगार ह्यूमनॉइड्स, बेबीसिटिंग साठी ह्यूमनॉइड नर्स , किंवा इतर कोणत्याही गरजेसाठी लागतील तसे लागतीलत्या मापाचे ह्यूमनॉइड्स बनणार होते.  त्यासाठी ओट ने कंपनी स्थापन केली "ओट कॉर्पोरेशन ". पुढच्या ३०-४० वर्षा मध्ये ओटचे ह्यूमनॉइड्स माणसाची जवळ जवळ सर्व काम करू लागले. माणसाचे हरकामे गडी असलेले हे ह्यूमनॉइड्स अजूनही माणसाच्या डोक्याने चालत. पुढेपुढे ह्यूमनॉइड्स निर्मितच काम सुद्धा ह्यूमनॉइड्स करू लागले.

मानव आता पूर्णपणे त्याच्यावर विसंबून होता. एक दिवस असा आला कि माणसाला त्याच्यावर कंट्रोल करणं ही कंटाळवाणं वाटू लागलं आणि त्या साठी ओट कॉर्पोरेशन विचार करू शकणारे कंट्रोलर ह्यूमनॉइड्स बनवले. आणि इथेच माणूस चुकला. विचार आणि निर्णयक्षमता असलेल्या ह्यूमनॉइड्स नी मानवाची सेवा करता करता स्वतःला अधिक कार्यक्षम बनवायला सुरुवात केली. सुखलोलुप माणसाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ह्यूमनॉइड्स अधिकाधिक सुखसुविधा निर्माण निर्माण करून माणसाला संपूर्णपणे परावलंबी बनवत होते. ह्यूमनॉइड्स नी माणसासाठी अवकाशात सुद्धा राहायची सोया केली. माणूस आता ह्यूमनॉइड्स च्या संपूर्णपणे आधीन झालेला आणि नाही म्हणायला काही माणसे होती जी ह्यूमनॉइड्स च्या वापरा विरोधात होती पण फार कमी. ह्या अँटी ह्यूमनॉइड्स चळवळी कडे लोक फार लक्ष देत नसत पण ह्यूमनॉइड्स ना माहित होत की हे लोक त्याच्या साठी घातक आहेत पण त्यांना हे देखील माहित होत की  या लोकांचा नगण्य विरोध त्यांच काहीसुद्धा बिघडवू शकणार नाही.

आणि एक दिवस माणूस ज्या ह्यूमनॉइड्स ना आपलं गुलाम समजत होता त्या ह्यूमनॉइड्सनी माणसाविरुद्ध बंड केला. ह्यूमनॉइड्सनी माणसाची काम करणं अचानक बंद केल. माणूस शॉक झाला त्याला कळत नव्हतं काय करावं ते, त्याची अधीनता इतकी वाढली होती की कुठलंही काम कारण त्याला अश्यक्य होऊन गेलं आणि तेच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरले वाचले ते अँटी ह्यूमनॉइड्स. त्यांना जितक्या लोकांना वाचवता आलं ते त्यांनी वाचवलं पण ते देखील किती लोकांना वाचवू शकणार होते? त्यांचा विरोध मोडून काढायला ह्यूमनॉइड्स ना फार वेळ गेला नाही. ह्यूमनॉइड्स नी पृथ्वी वर उरलेल्या सर्व माणसांना नष्ट केलं नाही कारण ह्यूमनॉइड्स अजून परिपूर्ण नव्हते त्यांना परिपूर्ण होण्यासाठी अजूनही माणसाची नव्हे त्यांच्या जिवंत शरीराची गरज होती आणि म्हणूनच ह्यूमनॉइड्स जगभरात उरलेली संपूर्ण मानव जमात गोळाकरून एका बेटावर आणून ठेवली. नाही म्हणायला १० लाख लोक या बेटावर होते आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवायला संपूर्ण बेटा भोवती डबल स्टेशन सिस्टीम.

सुरुवातीच्या काळात भांबावलेल्या माणसांना भानावर यायला काही वर्ष लागली. अँटी ह्यूमनॉइड्सपैकी जे कोणी वाचेल होते त्या लोकांनी उरलेल्या मानव जातीचं नेतृत्व स्वीकारलं. मानव त्याच्या मार्गदर्शनाखाली स्थिर होऊ लागले. अधून मधून  ह्यूमनॉइड्सच्या धाडी घडत असत पण हळू हळू त्याही कमी झाल्या. मानव त्या बेटावर स्थिर होत होता. पण त्यांच्या नेत्यांना ठाऊक होतं कि असं फार काळ टिकणार नाही आणि कधी तरी दोघांपैकी एकाच विनाश झाल्यावरच सर्व शांत होणार होतं. हळू हळू मानव प्रतिकाराची तयारी करू लागला. ते बेट तरी किती पुरणार होतं मानवाच्या गरजेला. मानवाची गरज वाढत होती. मध्यंतरीच्या काळात माणूस पुन्हा एकदा स्वावलंबी झाला होता,  ह्यूमनॉइड्सना चकवण्यासाठी त्याने हॅलोग्राफीक सिस्टीम बनवून बेटाभोवती पसरवली. या सिस्टिम मूळे  ह्यूमनॉइड्स थोडा वेळ कन्फ्युज झाले आणि याचाच फायदा घेत मानवाने ह्यूमनॉइड्स च्या सर्व बॅटल स्टेशन्स वर एकाच वेळी हल्ला केला. माणूस असं काही करू शकेल अशी शक्यता ह्यूमनॉइड्स गृहीत धरली नव्हती आणि त्याचाच फायदा माणसांना झाला. सर्व स्टेशन्स ऑटोमॅटिक असल्याने प्रत्येक स्टेशन वर खूप कमी ह्यूमनॉइड्स असत. माणसाने सर्व स्टेशन ताब्यात घेतली खरी पण त्याची खूप मोठी किंमत माणसाला मोजावी लागली, अर्ध्याहून अधिक लोकांचा जीव या युद्धात गेला. मानवाने स्टेशनवर नियंत्रण मिळवलं तर खरं पण ह्यूमनॉइड्स ती परत मिळवायचा प्रयत्न करणार हे ही तितकंच सत्य होतं. माणसाने मोर्चेबांधणी सुरु केली आणि त्यातूनच हॅलोग्राम नी स्टेशनच रक्षण करण्याची योजना आखण्यात आली. ह्यूमनॉइड्स नी माणसांना बेटावर बंदिस्त ठेवण्यासाठी निर्माण केलेली सिस्टीम आता मानवाचं ह्यूमनॉइड्स पासून रक्षण करत होती आणि हॅलोग्राम्स माणसाचे पहारेदार बनले.

पी पी पी पी पी पी पी पी पी पी.... सायरन च्या आवाजाने मार्क ची तंद्री मोडली समोरच्या स्क्रीनवर त्याने नेहमीप्रमाणे नजर टाकली. सगळं काम अगदी तांत्रिक पणे होत होतं. डिफेन्स सिस्टिम ऍक्टिवेट झाली. ह्यूमनॉइड्सचे फायटर स्टेशन्सवर बेछूट फायर करत होते आणि डिफेन्स सिस्टिम तो थोपवून लावत होती. अचानक हल्ला थांबला, मार्कला नवल वाटल्या वाचून राहील नाही कारण सहसा असा हल्ला तास भर तरी चालत असे आणि आताच हल्ला ५-७ मिनिटातच संपला, ह्यूमनॉइड्स च्या स्ट्रॅटजी मधल्या बदलाचं कारण मार्कला काळात नव्हतं. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मार्क ला वाटत होतं. काही रिस्क नको म्हणून मार्क १-२ मिनिटांचा रँडम फायर स्टेशन भोवती केला आणि प्रतिहल्ल्याची वाट बघत अटॅक पोजिशन मध्ये उत्तर देण्यासाठी सज्ज झाला. पण पुढचा एक दिड तास काहीच घडलं नाही आणि मार्कही थोडा रिलॅक्स झाला. मार्कला मनापासून वाटत होत की  काही तरी गडबड आहे. त्याचं मन अस्वस्थ होतं, मनातली चलबिचल त्या स्वस्थ बसू देत नव्हती. मार्क अस्वस्थपणे कंट्रोल पॅनलवर नजर भिरभिरवंत होता इतक्यातच डॉकिंग बेचा सिक्युरिटी कॅमेरा स्क्रीन वर सुरु झाला आणि मार्कचा संशय खरा ठरला, डॉकिंग बेमध्ये कोणीतरी प्रवेश केला होता. मार्क ने आवंढा गिळला आणि पुढे काय करायच त्याचा विचार मार्क करू लागला. मार्कने क्षणार्धात निर्णय घेतला आणि तो फोटॉन गन घेऊन डॉकिंग बे कडे धावला, अचानक तिथे मार्कला बघून ती आकृती घाबरली आणि गोंधळली, मार्क ने संधीचा फायदा घेत त्या आकृतीवर झेप घेतली आणि तिला स्वतःच्या ताब्यात घेतलं, मार्क ला लक्षात आलं तो एका २२-२३ वर्षाच्या मुलीच्या अंगावर झोपलेला होता. त्याने त्या मुलीचे हात घट्ट धरले, ती मुलगी त्याचा प्रतिकार करत नव्हती उलट त्याच्या कडे विस्मयाने पाहत होती. मार्कने त्या मुलीला एका खुर्चीला बांधलं, ती मुलगी तरीसुद्धा मार्ककडे तशीच एकटक मार्क पाहत होती, तिच्या नजरेत आश्चर्य ,आनंद, दोन्ही एकत्र दिसत होते. मार्कला तिची नजर फार विचित्र वाटत होती. " कोण आहेस तू ? इथे काय करतेस?... मार्क ने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती लावली, पण त्याकडे तिचं लक्ष नव्हत. मार्क चा राग अनावर होत होता पण त्याच्याकडे जणू तिचं लक्षच नव्हतं, अखेर मार्क ने त्या मुलीच्या जोरात मुस्कटात मारली. त्याचा फटका खूप जोरात होता, ती मुलगी खुर्चीसकट खाली पडली आणि भानावर आली. मार्कने पुन्हा एकदा तिला विचारलं " कोण आहेस तू ?", "माझं नाव किरा, त्या मुलीने उत्तर दिलं, मघाशी सुरु झालेल्या हल्ल्यात माझी होडी नष्ट झाली आणि मी पाण्यात पडले, जीव वाचवायला मी पोहत पोहत इथवर पोहोचले. मला वाटलं की इथे कोणीच नसेल, माणसे इथे आजकाल राहत नाहीत ना... किरा विचारपूर्वक उत्तरं देत होती. मार्क च्या डोळ्यात आजून अविश्वास होता, मार्क ने पुन्हा दरडावून विचारलं ," खरं सांग कोण आहे तू ?"  किरा ने पुन्हा तेच उत्तर दिलं पण या वेळी आवाज जरा रडवेला झाला होता. मार्क ने तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो डॉकिंग बे ची सिक्युरिटी चेक करू लागला. सगळं सुरक्षित असल्याचं पाहून त्याला जरा बरं वाटलं. इकडे तिकडे नजर फिरवत असतानाच त्याला किरा चा आवाज ऐकू आला, " मला वाटत होतं की सगळे ह्यूमन बेटावरच आहेत" मार्क हसला आणि म्हणाला "ते बरोबरच आहे." "मग तू इथे कसा?" किरा ने विचारलं. मार्क मोठयाने हसला " तुला कोणी सांगितलं कि मी ह्यूमन आहे म्हणून ? मी हॅलोग्राम आहे. तुझ्या सारख्या हुमनॉइडपासून मानवच रक्षण करणारा."

"मी हुमनॉइड नाही!!" किरा मार्क ला किंचाळून म्हणाली. "खरंच माझी होडी नष्ट झाल्याने मला इथे यावं लागलं, तसं पाहता चूक माझीच आहे, मला इथे यायलाच नको हवं होत, मला प्लिज सोडा मी जाते बेटावर.." किराचा आवाज रडवेला झाला होतां. मार्क ने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि थोडा रागातच तो तिला म्हणाला ,"असं बर तुला मी जाऊ देईन"

तू म्हणतेस की तू ह्यूमन आहेस मी नाही, तपास पूर्ण झालाय शिवाय तुझी सुटका नाही... सुटका नाही म्हणताना मार्क जोरात हसला, त्या हसण्याने किरा अधिक घाबरली "खरंच माझी सुटका कराल?" किरा ने मार्क ला विचारलं.... हो तर नक्की करणार एकतर बेटावर किंवा जगातून... मार्क छद्मीपणे हसला, त्याने किरा अधिकच घाबरली," खरंच मी ह्यूमन आहे हो..... सोडा मला.  नक्की सोडेन पण पुरावा दे तू ह्यूमन असल्याचा "मार्क म्हणाला, तुझा I D सांग , मी बेटावर कन्फर्म करतो ... किरा ने घाबरतच ID सांगितलं. मार्क ने बेटावरच्या कंट्रोल टॉवरला link केलं पण टॉवरहून काहीच उत्तर त्याला मिळालं नाही, मार्क ने पुन्हा एकदा प्रयत्न केला , पुन्हा अपयश, मार्क ला आश्चर्य वाटलं. असं कधी घडलं नव्हतं. वैतागून मार्क ने लिंकिंग चा नाद सोडला आणि कम्युनिकेशन अँटिना तपासायला गेला. तुटलेल्या अँटिनाकडे बघत मार्क ने जोरात एक शिवी हासडली आणि तो कंट्रोल रूम कडे जाऊ लागला, इतक्यात त्याला त्याची चूक लक्षात आली आणि तो जोरात धावू लागला त्याला घाम फुटत होता , त्याने सावधपणे रूम चा दरवाजा उघडला, समोर किरा नव्हती. मार्क च्या काळजाचा ठोका चुकला, घाबरतच त्याने त्याचा हात फोटॉन गन कडे नेला, पण गनही  जागेवर नव्हती, मार्क आजून घाबरला. डोळ्याच्या कोनातून त्याला काही हालचाल जाणवली, त्याचं लक्ष दरवाज्याकडे गेलं, किरा गन सोबत तिथे उभी होती, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, मार्क तिच्यावर हल्ला करायचा विचारात होताच इतक्यात फोटॉन गन चा फायर त्याला दिसला, मार्क कळवळला, डोळ्यात एक अश्रूची किनार आली. मार्क खाली पडला आणि त्याची शुद्ध हरपली.

भयंकर वेदनेनेच मार्क ला पुन्हा शुद्ध आली. मार्क ला घडलेल्या गोष्टी चा अंदाज आला त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. त्याने हताशपणे समोर बघितलं किरा समोर बसली होती, तिच्या चेहऱ्या एक विजयी हास्य होत, त्याचा मार्कला आजून राग आला, रागाने त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, किरा मार्क जवळ आली आणि तिने मार्क चे डोकं कुरुवाळलं. मार्क ने किराला जोरात ढकललं, ती समोरच्या भिंतीवर जाऊन आदळली, त्यातून सावरत किरा उभी राहिली आणि जोरात हसू लागली, लागली, हसता हसता तिचा चेहरा भेसूर झाला आणि रागातच तिने फोटॉन गनचं हॅण्डल मार्क च्या डोक्यात मारलं मार्क पुन्हा बेशुद्ध झाला, त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं, बऱ्याच वेळाने मार्क जेंव्हा पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा किरा त्याच्या जवळ बसली होती, मार्क ने हालचाल करायचा प्रयत्न केला पण किराने  त्याला घट्ट बांधून ठेवलं होतं. किराने प्रेमाने मार्क च्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "तुला काही होता काम नये, निदान तुझ्या मेंदूला तरी" असं बोलत असताना किरा ने मार्क च्या डोक्याचं चुंबन घेतलं, मार्क ने तिला झिडकारलं पण तिने त्या कडे दुर्लक्ष केलं. त्याला तिथेच सोडून ती कंट्रोल पॅनल कडे गेली आणि तिने कोणाशी तरी संपर्क केला, ती सांगत होती "ह्यूमन मिळालाय, we are lucky, आपण परिपूर्ण होणार, बेटाची गरज संपली". 

मार्क शुद्धीवर आला तेव्हा किरा मार्कचे ब्लड सॅम्पल जीनोम कोडिंग साठी अपलोड करत होती, तीव्र वेदनेमुळे मार्क कळवळत होता, थोडं अडखळत त्याने किरा ला विचारलं ,"तुला कसं कळलं की मी हॅलोग्राम नाही ते?" किरा हसली आणि म्हणाली "मघाशी जो फायर झाला तो फक्त फायर नव्हता तर हॅलोग्राम डी आक्टिवेट करणारा स्वीप पण होता, जेव्हा मी स्टेशनमध्ये प्रवेश केला तेव्हा मला खात्री होती कि इथे कोणीच नसेल पण जेव्हा तुला बघितलं तेव्हाच मला लक्षात आलं की तू ह्यूमन आहेस हॅलोग्राम नाही. पण मला एक कळत नाही की तू इथे काय करतोयस ते? पण आता काहीच फरक पडत नाही, तुझ्या इथे असण्यामुळे आता आमची सगळी काळजी मिटली आहे, तुझा ब्रेन एकदा का आमच्या सिस्टिम ला जोडला की काम संपलं आम्ही परिपूर्ण बनू, ह्यूमन जिवंत ठेवण्याची गरज उरणार नाही. "

मार्क ला पुन्हा ग्लानी आली , काही वेळाने तो जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला लक्षात आली की  तो हुमनॉइड टान्सपोर्ट मध्ये एका खुर्चीवर बांधलेला होता आणि किरा त्याच्या समोर बसली होती , त्याने किराला विचारलं," तू माझं काय करायचं ठरवलंय ?"
"काही विशेष नाही" किरा म्हणाली तुझा ब्रेन आमच्या सिस्टिम ला कनेक्ट करणार, आम्हाला आजून एका ह्यूमन ब्रेन ची गरज होती सिस्टिम पूर्ण करायला, तू भेटल्यामूळे आता आमची सिस्टिम पूर्ण होईल. तू आमचा न्यूरॉनिक कॉम्पुटर परिपूर्ण करणार. मार्कचं डोकं खाली झुकलं होतं.
काही वेळाने टान्सपोर्ट एका मोठ्या इमारती जवळ थांबलं, किरा आणि इतर हुमनॉइड नी  मार्क ला बाहेर आणलं, मार्क पहिल्यादाच हुमनॉइड शहर पाहत होता, वरपांगी माणसासारखे दिसणारे हुमनॉइड आजूबाजूला वावरत होते, त्याच्या हालचालीत एक यांत्रिकपणा जाणवत होता. सगळं काही सुनियोजित चालू होतं अगदी काटेकोर. मार्क आजूबाजूला पाहत होता, किरा त्याला म्हणाली, विचित्र वाटून घेऊ नकोस, आम्ही सारे जण एकाच न्यूरॉनिक कॉम्पुटर शी जोडलेले आहोत त्यामुळेच इतके सुसूत्र आहोत, माणसासारखे नाही. मार्क च्या चेहऱ्यावर क्षणभरच स्मित रेषा उमटली, पण मार्क पुन्हा गंभीरपणे किरा मागे चालू लागला. 

मार्क ला एका मोठ्या प्रयोगशाळेत नेण्यात आलं, तिथे हजारो माणसे वेगवेगळ्या काच पेट्यात ठेवलेली होती त्याच्या ब्रेनला एक वायर जोडली होती, तिथल्या एका रिकाम्या पेटीत मार्क ला झोपवण्यात आलं, काही काळ तसाच गेला आणि मार्क च्या मेंदूत एक जोराची कळ आली, किरा त्याच्या जवळच होती, तूला न्यूरॉनिक कॉम्पुटरला जोडलंय , काही काळातच तुझा मेंदू पूर्णपणे न्यूरॉनिक कॉम्पुटर ला कनेक्ट होईल आणि त्यानंतर तूझ माणूस म्हणून अस्तित्व संपेल, राहील फक्त तुझा मेंदू आमच्यासाठी काम करणारा. मार्क च्या डोक्यात खूप दुखत होत, किरा समोरच उभी होती, ९०% कनेक्शन झाल आहे, आता १०% झाला कि आमचं काम झालं. किरा मार्क ला म्हणाली, इतक्यात जोरात सायरन वाजू लागला, न्यूरॉनिक कॉम्पुटरवर हल्ला झाल्याचा, मार्क जोर जोरात हसत होता, काय केलस तू? किरा मार्क वर किंचाळली. समोरच्या स्क्रीन वर सिस्टिम फेल्युअर चा संदेश झळकू लागला होता, न्यूरॉनिक कॉम्पुटरवर व्हायरस ने हल्ला केला होता. सिस्टिम रिकव्हरी साठी हुमनॉइड प्रयत्न करू लागले. त्यांना कळतच नव्हतं की काय झालाय ते. किरा ने मार्क ला न्यूरॉनिक कॉम्पुटरपासून एक  झटका देऊन वेगळं केलं , वेदनेने मार्क कळवळला पण तरी तो हसत होता, "काय केलंस तू ?" किराने मार्क ला किंचाळून विचारलं. मार्क ओरडला "माणूस जिंकलाय, आम्ही जिंकलो, मी एक सावज होतो, माझ्या मेंदूत असलेल्या व्हायरस ने तुमचा न्यूरॉनिक कॉम्पुटर इन्फेक्ट झालाय , आम्हाला वाटलेलं कि आम्ही फक्त तुमचा कॉम्पुटर नष्ट करू, पण जसे तुम्ही सारे न्यूरॉनिक कॉम्पुटर ला कनेक्ट आहेत तसे तुम्ही ही व्हायरय ने इन्फेक्ट होणार आणि नष्ट होणार. तू विचारलेस ना मी स्टेशन वर कसा, मी तुमच्या कडून पकडला जाण्यासाठीच तिथे होतो, तुमच्या विनाशाचं मानवच अस्त्र, एका मानवानेच तुम्हाला बनवलं आणि मानवच तुमच्या विनाशाच कारण बनला, शिकाऱ्याची शिकार झाली, माझं काम फत्ते, मी जिंकलो. मार्क जोर जोरात हसत होता, आजूबाजूच्या कोलाहलात त्याच हास्य विरून जात होतं, त्याला त्याच भान नव्हतं. मार्क हसतच होता. 

Sunday, January 7, 2018

तीन कविता

तीन कविता 
एक कावळा 
भलताच बावळा
भर दुपारी ,भुकेने व्याकुळ
फिरून फिरून झाला
सावळा



कावळ्या च्या मुखाचे
चार दाणे फुकाचे
दोन तुला ,एक मला
उरला एक जगाला



कावळ्याची वाणी
जणू खाडीसाखरेची खाणी
कधी स्वरमंजुळ गाणी
कधी रम्य कहाणी