Friday, January 24, 2014

त ला त ध ला ध म ला म

त ला त ध ला ध म ला म 
अग एक चहा आण न ग 
(चहा कश्याला आता कडमडायला ?)
अग लिहायला बसलोय ना मी 
विचार  नको का यायला मला ?

त ला त ध ला ध म ला म 
काय लिहावं बर 
एखाद नाटक 
नको त्या पेक्षा 
दीर्घ कविता बरी ,
ते ही नको 
आजकाल तिला ही नाही कोणी वाली 

त ला त ध ला ध म ला म 
काय लिहाव बर ?
अग चहा मिळेल न ग ?
गरज आहे मला 
विचार नाही सुचत मला 

त ला त ध ला ध म ला म 
कादंबरी ला म्हणतो मम ,
इतिहासातली पात्र करतो जिवंत 
पण आधी आभ्यास करतो 
ती जुनी बखर चाळतो 

त ला त ध ला ध म ला म 
किती हे रटाळ 
नुसते टेक्निकल लिखाण 
झोप येतेय मला 

त ला त ध ला ध म ला म 
अग चहा नको मला 
डोळे जड झालेत 
झोपतो थोडा 
साहित्याचा इतका डोस 
आजच्या पुरता पुरे झाला 
त ला त ध ला ध म ला म 

Sunday, May 5, 2013

विचार


चला विचार करूया असं ठरउन मी विचार करायला बसलोय, त्याच कारण म्हणजे माझा  मित्र, तो लेखक आहे ,त्याला काही सुचत नव्हतं  chat वर त्याने मला तसं सांगितल सुद्धा, मी त्याला म्हणालो की ,"असे विचार करून विचार थोडीच येतात, ते अचानक हवेतून पडल्यासारखे टपकतात , आगदी न सांगता." थोडं आजून मी फिलोसोफिकल मारायला लागलो तेव्हा झोप येते असं सांगून तो ऑफ लाईन गेला, कदाचित  झोपला ही असेल पण माझी मात्र झोप उडाली. आता मी काय करू?
   
विचार करू का ?  , काही सुचतंय का पाहू, पण आगदी random. आता मी जे काही लिहीन ते अगदी जसं सुचेल तसं असेल आगदी विचार न केल्यासारखं 

……………… hm ……… आता मात्र एक प्रोब्लेम झालाय,खूप विचार करतोय मी, ते चुकीच आहे. आगदी random लिहील पाहिजे

मग सुरु करू का ? कोणी आडवलय ? कोणीच नाही hm …… काय बर लिहू हा पहिला विचार , आता मारायला हे सुरूच का केल हा दुसरा. डोक्यावर पंखा  फिरतोय, हवा थोडी उष्ण आहे, रात्र आहे, मी वेडा  आहे का? नाही , मग आस अविचारी प्रयोग मी सुरु का केला , कारण माझा मीत्र , आता मित्र चा मि  मी चुकून दीर्घ का लिहिला, बर लिहिल्यावर दुरुस्त न करता तसाच का ठेवला, मग ठेवलाय तर मलाच का बर ते चूक वाटतंय, कारण ते चूक आहे , मग मी ते खोडू का ? नको  यातल काही खोडता कामा नये , कारण खोडण म्हणजे विचार करून दुरुस्त केल्यासारखं होईल. ते चुकीचे ठरेल, मग मी काय करू,लिहीतच राहू का ? असं किती वेळ बर लिहाव ? एक तास ?नको ते जास्त होईल. let's write for not more then 10 minutes. टाइम ठरवला तर घाई का होतेय, आता उगीच लिमिटेशन आल्या सारख वाटतंय. आता हि लिमिट मीच ठरवली ना, मग वेळ संपेल म्हणून मी का घाबरतोय,वेळेच बंधन माझ्या पाळण्यावर आहें 10 म्हणजे दहाच … आता 9 खूप विचार मनात येतात ,किती मांडू आणि किती नाही,परीक्षेच्या शेवटच्या मिनिटासारख झालाय वेळ नाही आणि मोठा प्रश्न राहिल्या सारखं.पोटात गोळा आलाय. उगीच घेतल असं काहीतरी लिहायला. काही सुचतच नाही ,का ससंपले माझे विचार पण ते बर केसे संपतील? ते संपले तर मी नाही का संपणार? माझे विचारच  माझं अस्तित्व आहेत, मग त्यातला १% विचार सुध्दा का बर मी मांडू  शकलो नाही. असो वेळ संपत येतेय ,कि संपली तेच काळात नाही. कारण वेळ ठरवताना माझ्या कडे घड्याळ नव्हत मग वेळ संपली  ते कस कळणार ? नाही कळली तर काय मी लिहीतच राहू , ते योग्य नाही, कुठे तरी थाबायला हवं 
   मी थांबतो ………………………………. अजून विचार चालूच आहेत . 


Monday, April 1, 2013

पंखा ६


तेच तेच काम करून पंखा कंटाळला,
वैतागून मग स्वतः च बंद झाला ,
बिघडला म्हणून लोकांनी भंगारात विकला 
आता पंखा रिसायकल होतोय
पुन्हा पंख्याच्याच कारखान्यात 

स्वप्न

रात्री पडणाऱ्या स्वप्नाकडे खूप दूर्लक्ष केल्यानंतर कंटाळून स्वप्नांनी माझा नाद सोडला आणि रात्री अपरात्री माझ्या कडे लक्ष देणच सोडल. मग मात्र मी शॉक झालो. अस स्वप्नांनी माझ्या कडे दुर्लक्ष का बर कराव ? प्रश्नाने मग मी पछाडला गेलो. मग मात्र ठरवलं आता या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावायचाच. खूप ट्राय मारल्यावर एका स्वप्ना ने माझ आमंत्रण स्वीकारलं .स्वप्न खूप उदास झालेल , आगदी निस्तेज होतं. त्याला उगी उगी केल, तसं त्याला भरून आल, ढग दाटून आल्यागत ते बरसू लागल,मला त्याला धीर द्यायची हिम्मत नाही झाली ,मी गप्पा उभा होतो त्याच्या बाजूला, बरसणाऱ्या पावसात भिजत. खूप बरसल्यानंतर स्वप्न एकदम मोकळ झाल सकाळच्या उन्हागत उबदार. मी निरखून पहिल तर अनेक रंग होते त्यात,आणि शब्दही ,इतर बराच काहीतरी होत त्यात,कदाचीत कल्पना.स्वप्नाने मला जवळ घेतल. खांद्यावर हात टाकून आमही पुष्कळ हिंडलो. स्वप्नाला पडलेल्या स्वप्नात मी हरवून गेलो,किती तरी सांगायचं होत त्याला मला.किती खर होत ते. इतक्यात मला जाग आली.स्वप्नाचा विचार करत दिवस कसा गेला ते कळलं सुद्धा नाही. रात्री झोपी गेल्यावर मला लक्षात आल कि स्वप्न माझी वाट बघत होत,मला नवीन जगात घेऊन जायला

Tuesday, October 2, 2012

चल ना पुन्हा प्रेमात पडूया

एका जाहिरात संस्थे साठी सहज टाइमपास म्हणून केलेली कविता , पुढे काही झालं नाही , फार दिवसांनी मिळाली आता प्रकाशित करतोय


चल ना पुन्हा प्रेमात पडूया
निळे आकाश , हिरवे डोंगर
एकमेकांच्या डोळ्यांनी पाहूया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया
चिंब पावसात पुन्हा भिजूया
ओल्या वाटेवर आडोश्यापाशी
घट्ट मिठी होऊया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया
बेभान होऊ वाऱ्यागत
किवां
भरतीच्या लाटेसारखं
किनाऱ्याशी भांडूया
हातात हात घेऊन
शांत सूर्यास्त पाहूया
चल ना पुन्हाप्रेमात पडूया
प्रेमपत्र लिहूया
दोस्तानी चीडवल्यावर
खोट खोट रागवूया
आणि मग गुदगुल्या झाल्यागत
स्वतः शीच हसूया
चल ना पुन्हा प्रेमात पडूया

Thursday, January 19, 2012

शाळेचा मजा काही औरच होता

उन्हाळयाच्या सुटी नंतर मित्रांना भेटण्याचा ध्यास होता
शाळेचा मजा काही औरच होता
नवं कोर दप्तर नवी नवी छत्री
गावाला घडलेल्या नव्या गमतींची जंत्री
गमती सांगण्याचा आणि ऐकण्याचा काळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

नव्या कोऱ्या पुस्तकाचा कोरा कोरा वास
नव्या वहीच्या कव्हर ला स्टीकर ची आरास
वहीच्या आत नेहमीच घोळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

एक रुपयाचा वडा पाव
त्यात चार आण्याचा शेअर होता
तुटक्या फळीचा batball आणि
पुठ्याने टेनिस चा खेळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

दिवस तसे चांगले,स्वप्नाळू डोळ्यांचे
स्वप्नांच्या आकारला लिमिट नव्हता
शाळेचा मजा काही औरच होता

तेव्हा वाट पाहायचो,
लवकर मोठं होण्याची
स्वतत्र लाईफ जगण्याची
या नव्या लाईफ चा झटका खूप हॉरर होता
आणि खरच
शाळेचा मजा काही औरच होता

Thursday, January 5, 2012

पंखा ५

एकदा पंखा बंद झाला
कारण विचारले तर
चक्कर आली असे म्हणाला
हसून हसून लोक वेडे झाले
आणि धक्का देऊन त्यांनी
पंखा सुरु केला