Showing posts with label mi marathi. Show all posts
Showing posts with label mi marathi. Show all posts

Wednesday, June 26, 2019

अजगर

छोटसं शेत
नाजूकसा पाट
भरपुर झाडं
पक्षांचा किलबिलाट
छोटंसं घरं
शेजारी गोठा
बैल जोडी
दोन गाई
चांदी म्हैस
छोटं वासरू
इतका मोठा
दूर दिसणारी
शहराची हद्द
खुरड्यात राहणारी
दिशाहीन माणसं
कुबट हवा
धुळचं धूळ
अपूर्ण जागा
अजगराचं धूड
ह्याला गिळ
त्याला गिळ
अजगर करी
मोठं बीळ
अजगर ग्रासी
छोटसं शेत
उभी इमारत
एक गॅलरी
तीन कुंड्या
पक्षाचा पिंजरा
पाटाचं आता गटार झालंय.

Monday, June 20, 2011

भाड मै जाव

प्रेमाच्या या खेळामध्ये सगळे मजनू आंधळे,
गाढवालाही फुटतात मग इश्कचे धुमारे,
म्हैस इथे सुंदर वाटे प्रत्येक रेड्याला
उपचार नाही खर सांगतो आश्या वेडाला.
प्रेमाच्या युद्धात प्रत्येक रोमियो शहीद
फायदा नाही इथे काहीच
घाट्याचा मात्र डोंगर ढीग
म्हणून म्हणतो प्रेमात पडून
नुकसान कश्याला सोसा
ढोसायची आहेच तर मग happy होऊन ढोसा
प्रेमात पडून दुःखी होता कश्याला राव
लुट मजा दुनियेची
प्रेमं बीम बाकी सब भाड मै जाव

Saturday, May 28, 2011

विचार

आज दोन दिवस झाले आजून ही मी विचारच करतोय, पुष्कळ झालं विचार करून आता लिहावच असा निश्चय करून मी लिहायला बसलोय, पण लिहू तरी काय? आजूनही मी भरकटलेलाच आहे माझ्या विचारांत, पण या आधी ही मी विचार करत होतोच की, फक्त आता मी त्यांच्या कडे लक्ष देतोय.विचारांच्या विचाराने मी खूप संभ्रमात पडलोय, खरच आपले विचार भरकटलेले आसवे का ? की आपण ज्याला भरकटलेल म्हणतोय ते भरकटलेल नाहीच , ते आपल्यालाच असं वाटतंय, प्रत्येक गोष्टी ला काही तरी एक अर्थ असतो , मग माझ्या प्रत्येक विचारला ही असायला हवा, मग ते भरकटलेल्या सारखे का वाटतात? का मलाच तसं वाटतंय.पण वाटतंय म्हणजे तरी काय, तो ही एक विचारच आहे की. काही ही असो मी विचार तरी करतोय.

मनात शेकडो विचार भरून राहिलेत, मग कश्या पासून सुरुवात करावी बर, अगदी आताच सुचलेल्या गोष्टी पासून की फार पूर्वीच्या, काही तरी सुरुवात करायला पाहिजे.

पण नेमक लिहाव तरी काय ?
मी आजूनही विचारच करतोय .........

Wednesday, May 25, 2011

भरकटलेला मी

खूप विचार करून तीन चार ओळी सुचल्यावर असं लक्ष्यात आले की मी पहिल्या ओळीच विसरलोय,नेमका मुळचा विषयच विसरल्यावर आता लिहू तरी काय?, मग पुन्हा विचार सुरु केला,"कश्यावर लिहाव बरं?"आणि पुन्हा माझी गाडी भरकटली. विचारांचं हे असच असतं,नेमके कधी भरकटतील याच नेम नसतो, कधी कुठला रोड पकडतील ,आडवाटेने कल्टी घेतील सांगता येत नाही. तसा आता ही मी थोडा भरकटलोय, मग असं भरकटलेलच का बर नको लिहू, काय वाईट आहे त्यात ,एक नव ट्राय, बघूया जमतंय का, आणि नाही जमलं तर काय फरक पडतोय भरकटलेलच तर लिहितोय, चुकलो तरी कोणी फासावर लटकवणार नाही, आही खूप चांगल लिहिलय म्हणून काही मोठा सन्मान ही होणार नाही, मग जिथे काहीच मिळत नाही असा उपदव्याप कश्या करिता. उत्तर सोपं आहे "मला माहित नाही." जसं जमेल तसं लिहिणार,जेव्हा जमेल तेव्हा लिहिणार पण काय लिहिणार ते मात्र माहित नाही आणि तसं ही भरकटलेल्या विचारांना दिशाची माहिती हवी तरी कश्याला, जसं वाहतोय तसं वाहवत जावं, मुक्त राहावं, त्यातच माझं आणि त्याचं भलं आहे.

Monday, March 21, 2011

थेंब

मी एक थेंब आहे
विशाल महासागरातला
स्वतःचे अस्तित्व नसलेला
तरीही अस्तित्व जपू पाहणारा