Sunday, February 20, 2011

माझं चित्र

आता जरा बरं वाटतंय,
आधी बोर झालो होतो
वाटलेलं आता सगळं संपलं,
गेले ते जुने दिवस
सगळं कसं छान होतं
आपलं होतं,
आता सगळं बदलय
तेच बाक , तेच वर्ग
तेच फळे,तरी नव चित्र
ओळखीच सगळ असूनही
सार कसं नवं, सार कसं विचित्र
म्हणालो बेट्या हे तर होणारच होत
आपला असं इथे काय राहणार होतं ?
आपण होतो इथे आता याला पुरावा तरी काय
इथे आपल्याला विचारणार राहिलंच कुणी नाय
देव घरी आल्या सारखं लगेच निघणार होतो
हिरमुसला होऊन परत खुराड्यात परतणार होतो
वळलो होतो परत जायला,
तेव्हड्यात कुणी ओळखीच दिसलं
माझ्या इतकंच गांगरलेल होतं
मनात म्हणालो हा तर आपलाच भिडू
जुन्या आठवणी पुन्हा झाल्या सुरु
एकाचे दोन , दोनाचे चार
सगळे गाडी जमले
जुन्या नावांनी पुन्हा चिडवू लागले
हसण्या खिदळण्याचा कल्लोळ खूप वाढला
म्हणालो आता माझं जमाना परत आला
आताही होते तेच बाक , तेच वर्ग
पण सोबतीला होतं
माझं मला ओळखीच वाटणार
माझं आस्तित्व असणार माझं चित्र