Sunday, September 16, 2018

कोरडी भाकरी

कोरडी भाकरी
पातळ डाळ
स्वप्नांचं ओझं
आकांक्षा अपार
प्रचंड इच्छा,
संकटाचे काटे
वाटेत आले
अडचणीचे धक्के
खाल्या खस्ता
विसरून झोप
अखेर मिळाला
यशाचा राजमार्ग
भरधाव गाडी
यशच यश
गगनाला हात
नशिबाची साथ
प्रचंड व्याप
एक ना दोन
चिंता खूप
गेली झोप
झाली सुरू
डॉक्टरची खेप
डायटची चिंता
पुन्हा वाट्याला
कोरडी भाकरी
पातळ डाळ