Sunday, July 25, 2010

पोवाडा मुंबई च्या लाइफचा

सूर्य उगवला सकाळ झाली ,
चाललो आम्ही न्हाण्याला
लागली बायको डबा करायला
निघाली पोरे शाळेला

नऊ बरची लोकल आली
पकडला डबा बारावा
हाय हेलो आणि काय बोलो
ग्रुप होता नेहमीचा

पेपर ची ती देवघेव झाली
वाचती सारे रडगाणी
विषय मिळता नवा तिथे
आणि उधाण आले चर्चेला

वाटप झाले पाण्याचे अन
वाटला प्रसाद कुणी शिर्डीचा
समदुख्याचे जत्थे उतरले
आले स्टेशन व्ही टी ना....

गर्दी मिसळता दहा गाड्याची
झाला मोठा कल्लोळ
धावे कुणी बस साठी
डावी हाथ कुणी taxi ला

ऑफीस येत धावू लागलो
चुकवण्या तो लेटमार्क
समोर पाहता मस्टर
आणि जीव पडला भांड्यात

झाले सुरु रहाटगाडे
पडला ढीग फायलींचा
लंच ला खाल्ली पोळी भाजी
अंन प्यायला चहा नेमाचा

दिवसाचा तो खेळ संपला
सुटले ऑफिस सहाला
साडेसहा ची फास्ट पकडली
लटकलो आम्ही दाराला

आलो थकून नाक्यावरती
फोन आला बायकोचा
आणा एक भाजी साधी
अन आहो साबण संपला न्हाण्याचा

येता घरी बसलो शांत ,
गोंगाट सुरु पोरांचा
टि व्ही चे ते भिकार प्रोग्राम
बायको बसली पाहण्याला

जेवलो शेवटी भाजी भाकरी
टेकले अंग गादीला
डोळा लागला ,दिवस संपला
दिवस संपला लाइफचा
दिवस संपला लाइफचा

Monday, July 19, 2010

आमच्या इथे

आमच्या इथे,लाईट जाते दिवसातनं दोनदा
आठ तास रेग्युलर आणि चार तास एक्स्ट्रा
आमच्या इथे, पाणी जातं आठवड्यातून तीनदा
येत बाकी चार दिवस आधना किवा मधना
आमच्या इथे,आहेत सोई सुविधा ही खूप
शाळा, हॉस्पिटले आणि इतर दुकान, मॉल ही खूप
आमच्या इथे नाही म्हंटल तरी आहेत सारे संस्कारात
भकारांती भांडणे जरी असली नेमात
आमच्या इथे सगळे रोज डेली सोप बघतात
टीव्ही वरच्या दुखांना उगाच हळहळतात
आमच्या इथे कोणी कोणाच्या मध्यात नाही पडत
थंडी आसो वा पावसाळा आपलं खुराडं नाही सोडत
आमच्या इथे दारांमागे होतात सन साजरे
बाहे मारो कोणी आसतात आत गुढी तोरणे
आमच्या इथे लाईफ उगाच नाही थांबत
बंद ,स्फोट ,पूर याला कुणीच नाही घाबरत
आमच्या इथे भूतकाळाला नाही काही स्थान
घड्याळ्या सारखं पुढे जाण याच आम्हाला भान

पोपट आणि कोकिळा

एकदा एक पोपट पडला कोकिळेच्या प्रेमात
मागे मागे तिच्या सतत फिरू लागला रानात
चोचीत नेहमीच तिचे नाव,गुंजारव जोरात
कोकिळा जरी टाळे त्याला,हा तिच्या घरात.

वेडा राघू वेडा राघू सारं जंगल त्याला चिडवे
दशा बघून कोकिळेचे मन झाले हळवे

डोक्यावरनं पाणी गेले,पोपट झाला दिवाणा
सतत सतत तिला भेटण्याचा करू लागला बहाणा

घाबरून त्याला कोकिळा, जात असे पळून
समजावण्याचा तरी प्रयत्न करी अगदी लपून

साम दाम दंड ,सारे मार्ग जरी संपले
युद्ध प्रेमाचे पोपटासाठी आजून होते जुंपले

अखेर थकून कोकिळा आली त्याच्या दारात
सुरू केला अखेरचा यत्न केविलवाण्या सुरात

अरे बाबा होऊ शकत नाही तुझी
पक्षी जरी असलो तरी आपली ब्रीड आहे निराळी
तू आहेस पोपट, सतत करतो विठू विठू
अन मी कोकिळा, करते कुहुहू
रंगाने तू हिरवा आणि मी काळी
जमेल कशी सांग आपली ही जोडगोळी
राघू मैना जोडी साऱ्या नुसत्या कल्पना
सोड तू साऱ्या प्रेमाच्या वल्गना
सोडून दे वेडेपणा हो जरा शाहणा
जीव घेईन माझा मीच,नाही हा बहाणा

अखेर मनावर दगड ठेवून,पोपट झाला तयार
प्रेमाच्या युद्धात घेतली त्याने माघार
ह्रिदय आपलं घट्ट करून पोपट अखेर वदला
येणार नाही मार्गात तुझ्या,जरी प्राण माझा गेला

आसवं होती थोडी दोघांच्याही डोळ्यात.

उडून गेली कोकिळा जेव्हा
सारी सृष्टी हळहळली
भकास झाली जिंदगी
पोपटाने मान टाकली
जखम झाली मनाला, हा घाव कसा भरू ?
बराच काळ गेला,आता त्यावर खपली लागली धरू

पुढे भेटला कोकिळेला तिचा मनाजोगा प्रियकर
निघून गेला सुख काळ किती तरी भुर्कन.

अश्याच एका बेसावध क्षणी काळ आला धावून
लपला होता पारधी तिथे अगदी घात लावून
टाकल जाळ त्याने त्यांच्या वर अगदी नेम धरून
झाली खूप ओढाताण,कोकीळ गेला मारून
भान हरपला कोकिळेच आकानतांडव करून

आली शुद्ध जेव्हा तिला,होती एका पिंजऱ्यात
इकडे तिकडे पाहता आल काही तिच्या ध्यानात
सोबत पिंजऱ्यात होता पोपट , बसला एका कोपऱ्यात
आणि तीच आसवं पुन्हा होती दोघाच्याही डोळ्यात.

Monday, July 12, 2010

एक प्रेम कविता

सखे ग, नाही लिहिता येत प्रेमपत्र मला ,
तुझ्या वरच प्रेम व्यक्त करायला शब्दच नाही सापडत मला ,

सखे ग,पौर्णिमेच्या चंद्राशी तुझी तुलना नाही करवत ,
तुझ्याशी तुलना करण्या इतका तो सुंदर आहे,हेच मुळात नाही पटत.

सखे ग, तुला डोळे भरून पहाव अस खूप वाटत ,
पण माझीच तुला नजर लागेल,माझं मन खूप सतावत

सखे ग, प्रेमासाठी शपथ घेण नाही जमत
सतत सतत पुरावे देत बसणं बरं नाही वाटत.

सांगून सांगून थकलो,सांगू किती तुला
सतत सतत सांगण्याचा कंटाळा आला मला

Thursday, July 8, 2010

गाढव प्रेमं

गाढव प्रेमं
प्रेमात पडल्या वर माणूस गाढव बनतो
मग गाढव काय बनत असेल ?
असा प्रश्न मी माझ्या
नेहमीच प्रेमात पडणाऱ्या मित्राला विचरला

माहित नाही बुवा ,
सध्या मी तिच्या प्रेमात गाढ बुडलो आहे
असे तो म्हणाला

मी म्हणालो "पुन्हा?"
हे कितवे ?
खर प्रेम हे पहिलंच तो म्हणाला
मग गेली दहा प्रेमं.... त्याचं काय ?
ती .....
ते फक्त मनाचे खेळ होते माझ्या
हे खर खुर आहे
मी म्हणलो बरं, असेल बुवा
आपल्याला काय ?
आपण कुठे प्रेमात पडलोय कोणाच्या ?
पण मग गाढवाचे काय ?
मी मित्राचा विचार सोडला

दोन्ही विचार विसरून आता
गेला बराच काळ
अंदाजे महिना भर अधिकच
बसलो होतो पुन्हा विचार करत
नेहमीच्या कट्ट्यावर कसलातरी
तोच शेजारून गाढवासारख्या स्वरात
कोणी तरी रडू लागल,
गाढव आसपास नसतानाही
हे कोन रडताय पाहता
माझा प्रेमात पडणारा मित्र दिसला

अरे काय झालं? रडतोस का ?
माझा डायलॉग संपण्या आधीच
त्याने माझा खांदा धरला
भदाभदा रडत,माझा शर्ट ओला करत
चिरक्या आवाजात तो बोलला
तिने मला सोडलं,माझ्या नकळत
माझ्या साहेबालाच तिने गटवल ,
आता मी जगू कसा ?
त्याने मला प्रश्न केला
उत्तर काय द्यावं, विचार करत होतो
इतक्यात पुन्हा कोणी तरी गाढवा सारखं हसलं
आणि पाहतो तर काय
समोरून खरच एक गाढव आम्हा कडे पाहत
हसत हसत निघून गेलं.