Friday, April 23, 2021

आपुन बी कविता कारुयाना बे

आपुन बी कविता कारुयाना बे
सुई ला जुई, वेडावलेलं मन त्याला जोडून शहरलेलं तन
असं आपुन बी यमक जुळूया ना बे
चल ना आपुन बी कविता कारुयाना बे
बाँबे मंदी राहून ,पावसाळ्यात दुष्काळ पाडून ,
गावच्या गड्याचं रडणं बी गाऊया ना बे
चल ना आपुन बी कविता कारुयाना बे
येसी (AC) मंदी बसून,
ढवळ्या पवळ्याना संग घेऊन
नांगर बी चल जोतुया ना बे
चल ना आपुन बी कविता कारुयाना बे
पीज्जा चा तुकडा गिळता गिळता
भाकरीचा चंद्रर बी करू
अन, कांदा बी बुक्की न मोडूयाना बे 
चल ना आपुन बी कविता कारुयाना बे
घाबरून शेपूट घालून बसलोकी मंग
एक भारी पोवाडा बी लिऊ या ना बे
चल ना आपुन बी कविता कारुयाना बे