Tuesday, March 15, 2011

मन

मन अथांग सागर
त्याला खडकाचा किनारा
कधी शांत शांत सारे
कधी तुफानश्या लाटा

मन अथांग सागर
दूर क्षिताजा पार गेला
कवेत घेवून सूर्या
अस्ताला नेणारा

मन अथांग सागर
त्याला छप्पर आकाशाचे
कधी स्वच्छ स्वच्छ सारे
कधी अंधारून आलेले

मन अथांग सागर
त्याला चंद्राची ती ओढ
अशक्य जरी काही
त्याला उंच उंच उधाणे

मन अथांग सागर
त्याचा ठाव ना कुणाला
अथक प्रयत्ना नंतरही
एक प्रश्न चिन्ह मोठे

मन अथांग सागर
धरणीला बिलगलेला
जरी बांध नसे त्याला
किनाऱ्याने बांधलेला

No comments:

Post a Comment