Monday, April 1, 2013

स्वप्न

रात्री पडणाऱ्या स्वप्नाकडे खूप दूर्लक्ष केल्यानंतर कंटाळून स्वप्नांनी माझा नाद सोडला आणि रात्री अपरात्री माझ्या कडे लक्ष देणच सोडल. मग मात्र मी शॉक झालो. अस स्वप्नांनी माझ्या कडे दुर्लक्ष का बर कराव ? प्रश्नाने मग मी पछाडला गेलो. मग मात्र ठरवलं आता या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावायचाच. खूप ट्राय मारल्यावर एका स्वप्ना ने माझ आमंत्रण स्वीकारलं .स्वप्न खूप उदास झालेल , आगदी निस्तेज होतं. त्याला उगी उगी केल, तसं त्याला भरून आल, ढग दाटून आल्यागत ते बरसू लागल,मला त्याला धीर द्यायची हिम्मत नाही झाली ,मी गप्पा उभा होतो त्याच्या बाजूला, बरसणाऱ्या पावसात भिजत. खूप बरसल्यानंतर स्वप्न एकदम मोकळ झाल सकाळच्या उन्हागत उबदार. मी निरखून पहिल तर अनेक रंग होते त्यात,आणि शब्दही ,इतर बराच काहीतरी होत त्यात,कदाचीत कल्पना.स्वप्नाने मला जवळ घेतल. खांद्यावर हात टाकून आमही पुष्कळ हिंडलो. स्वप्नाला पडलेल्या स्वप्नात मी हरवून गेलो,किती तरी सांगायचं होत त्याला मला.किती खर होत ते. इतक्यात मला जाग आली.स्वप्नाचा विचार करत दिवस कसा गेला ते कळलं सुद्धा नाही. रात्री झोपी गेल्यावर मला लक्षात आल कि स्वप्न माझी वाट बघत होत,मला नवीन जगात घेऊन जायला

No comments:

Post a Comment